अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- देशभरातील साई भक्तांना साई दर्शनाची आस लागलेली असून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर राज्य सरकारने नियमावली तयार करून शिर्डीचे साईबाबा समाधी मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे,
अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी केली आहे. दीड वर्षापासून साई बाबांचे मंदीर कोरोनामुळे सरकारने भाविकांसाठी बंद केल्याने देश विदेशातील साईभक्तांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंदीर कधी उघडणार याकडे भाविकांचे डोळे लागून आहेत.
मंदीर बंद असले तरी गुरुपौर्णिमा उत्सवात कळसाचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि राज्या बाहेरून हजारो भाविक शिर्डीत आले होते. तिरुपती बालाजी, काशी विश्वनाथ आणि उज्जैनचे महाकालेश्वर मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
त्याच धर्तीवर कोविड लस घेतलेले आणि दररोज पाच हजार भाविकांना ऑनलाईन पास तसेच फिजिकल डिस्टन्सिंग नियमावली तयार करून साई मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात यावे.
दीड वर्षापासून मंदीर बंद असल्याने शिर्डीतील अर्थकारण ठप्प झाले आहे. ५० हजाराच्यावर लोकांचा रोजगार बुडाला आहे.
हॉटेल व्यावसायिकांपासून लहान मोठे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहे. विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम