विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खोटी माहिती पसरवत आहेत !

Ahmednagarlive24
Published:
state employee news

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

मंत्री मलिक म्हणाले, कोरोना रुग्णांचा आकडा किंवा मृतांचा आकडा राज्य सरकारने लपवलेला नाही. सरकार याबाबत खूप गंभीरतेने काम करत आहे.

जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना काळात करत असलेल्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

सर्वोच्च न्यायालयास विविध न्यायालये, नीती आयोगानेही कामाची प्रशंसा केली आहे, हे विरोधी पक्षांना पचनी पडत नसल्याचे ते म्हणाले.

गुजरात राज्यात ७१ दिवसांत ६१ हजार नागरिक पॉझिटिव्ह झाल्याचे वृत्त आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने लोकांचा मृत्यू होत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये दोन हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील चांगले काम पचत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe