अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लग्नाचे नाटक करुन तिच्यावर वेळोवेळी त्याच्या घरी अत्याचार केला.
तसेच फ्लॅट घेवून देतो असे म्हणून 2 लाख 80 हजार रुपये पीडित महिलेकडून घेऊन तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
याप्रकरणी 45 वर्ष वयाच्या महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारीवरून एक़ा जणाविरुध्द फसवणुकीसह अॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर बंटी आछडा मला म्हणाला की, माझे सोबत चोरून लग्न कर मी तुला राहण्यासाठी एक नवीन फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणून आरोपी मला अशोकनगर परिसरातील एका मंदिरात घेऊन गेला.
तेथे त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावून तू माझ्यासोबत लग्न केले आहे, असे कोणालाही काही सांगायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर बंटी आछडाने अनेकदा माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला.
तसेच मला नवीन फ्लॅट घेऊन देतो असे सांगून 2 लाख 80 हजार माझ्याकडून घेऊन मला फ्लॅट खरेदी करून दिला नाही.आरोपी बंटी आछडा याने पैसे घेतले, फ्लॅट दिला नाही व पैसेही परत दिले नाही.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी बंटी मोहन आछडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम