नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे करण्याचे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राज्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. १५० नगरपरिषद व नगरपंचायतसाठी राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी लेखी आदेश काढून नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहे.

त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. माहे डिसेंबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रारीत करण्यात आले आहे.

शासनाने १२ मार्च २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम २०२० अन्वये सर्व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यसीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यसीय प्रभाग पद्धत्ती लागू केली आहे.

यावेळी प्रत्येक प्रभागात एकच सदस्य असेल प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यलयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची सन २०११ ची आकडेवारी विचारात घेतली जाणार आहे.त्यानुसार प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाविरुद्ध रिट पिटीशियन क्रमांक ९८०/२०१९ मध्ये दिनांक ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार कार्यवाही करावयाची आहे. आरक्षणासंदर्भात प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडतच्या सूचना नंतर देण्यात येतील.

नगरपालिकांची मुदत समाप्ती पूर्वी निवडणुका पार पाडणे शक्य होण्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यातील १५० नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचे तयारी सुरू झाल्याने निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe