युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  राज्‍यातील युवक-युवतींसाठी कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्‍तालयामार्फत स्‍पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 11 जून 2021 रोजी दुपारी 3 वाजता वेबिनारचे आयोजन करणय्ात आले आहे.

यामध्ये सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रकल्‍प अधिकारी, चंद्रपुर रोहन घुगे, उपजिल्‍हाधिकारी गौरव इंगोले, ज्ञानदीप अकॅडमी, पुणेचे संचालक महेश शिंदे हे फेसबुक व युट्युब लाईव्‍हद्वारे केंद्रीय/राज्य लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहेत.

अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व बेरोजगार युवक / युवतींनी फेसबुक https://www.facebook.com/MaharashtraSDEED आणि युट्युब https://www.youtube.com/channel/UC702gQB5q7ValTABN4FHw1A या लिंकद्वारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगरचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe