दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यच्या वाटा, आशा आणि आनंदाच्या वेबीनारचे आयोजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली असताना, उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने दि.17 व 18 जुलै रोजी भविष्यच्या वाटा,

आशा आणि आनंदाच्या या दोन दिवसीय मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन शिबीरात विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर,

सचिव हेमंत लोहगावकर व प्रकल्प प्रमुख चंदना गांधी यांनी केले आहे. या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित राहणार आहे.

शनिवार दि.17 जुलै रोजी सकाळी 7 वाजता हेल्थ आणि वेलनेस कोच डॉ. राहुल खिस्ती विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्य व सजारात्मक विचाराने आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर रविवार दि.18 जुलै रोजी प्रोफेसर सीनियर करियर काऊन्सलर श्रीकांत कलंत्री आवडीचा योग्य करिअर कसा निवडावा?

व स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्ती संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही सत्र एक तासाचे असणार असून, झुम अ‍ॅपद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.

वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी मिटिंग कोड-9519345476, पासवर्ड आरआयडी (RID) 3132 देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 9423792490 व 9823181716 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe