राज्यात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात आढळले ३५ हजार ९५२ करोनाबाधित वाढले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे.

राज्यात आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज २० हजार ४४४ रुग्ण देखील झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe