अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा जर सोमवारपर्यंत तपास लागला नाही तर सोमवार पासून गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी आज एक दिवसाचा बंद पाळला आहे .
याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपर्णाला तब्बल पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणताच सुगावा पोलिसांना लागला नाही. नुकतेच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बेलापूरला भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या तसेच गावातील सीसीटीव्ही फुटेजची देखील पाहणी केली.

हिरण कुटुंबे तसेच ग्रामस्थ, व्यापाऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावून हिरण यांचा शोध घेऊन सुखरूप सुटका करावी तसेच या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. या मागणीसाठी पोलिसांवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा दबाव वाढत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवण्यात येणार आहे जर सोमवार पर्यंत या घटनेचा शोध लागल्यानंतर पुढे गाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे . हिरण गेल्या सोमवारपासून बेपत्ता आहेत. गावाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|