अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-संगमनेर तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नेमले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
नियमांचे पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिला.
लग्न समारंभ, अंत्यविधी व दहाव्याची गर्दी कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी शासनाने संख्येबाबत निर्बंध घातले आहेत.
लग्नसमारंभात ५०, तर अंत्यविधी व दहाव्यासाठी २० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक प्रत्येक ठिकाणी भेट देणार आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. मास्कचा वापर करावा.
फिजिकल डिस्टन्स ठेवावे. नियमांचे तंतोतंत पालन केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही. या लॉकडाऊनची परिस्थिती अवघड असेल.
सामाजिक संस्थादेखील आता पुढे येणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी स्वतः व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. मंगरुळे यांनी केले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|