अन्यथा भरचौकात गांजा वाटू: मनसेचा सरकारला इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- देशभरात इंधन दरवाढीने कहर केलेला असून यात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना सत्ताधारी व विरोधक गप्प बसलेले आहेत.याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे मनसेच उपजिल्हाध्यक्ष मारुती आनंदा रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना लाडूचे वाटप करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी नितिन भुतारे यांनी मोदी सरकारवर टीका करताना सांगितले की, ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये खेळताना एखाद्या खेळाडूने जर शतक ठोकले तर पूर्ण संघ उत्सव साजरा करतो, त्याप्रमाणे आज पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी गाठीत आहेत. त्यामुळे आज आम्ही लाडू वाटून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत.

येणाऱ्या काळात जर पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक चौकात गाजांचे लाडू वाटप करील. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकाले पारनेर तालुका विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अशपाक हावलदार,

पारनेर शहर अध्यक्ष वसिम राजे, पारनेर तालुका उपाध्यक्ष-सतीष म्हस्के, संदीप चव्हाण,  किशोर जाधव, बाळासाहेब माने, संपत रोहोकले,बाबाजी मोरे,गणेश रोहोकले, अनिल रोहोकले, संदीप तरटे, निलेश ठाणगे, संभाजी राऊत, विकास रोहोकले आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe