हमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-राहाता तालुक्यातील लोहारे येथील साई गॅसनिर्मित प्रकल्पाला ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक लिक्विड आमदार राधाकृष्ण विखे यांनी उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीला शनिवारी प्रारंभ झाला.
यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला. लोहारे येथे भाऊसाहेब पोकळे यांनी काही दिवसांपूर्वी साई गॅस या नावने प्रकल्प उभा केला. मात्र, हा प्रकल्प सुरू होण्यात काही प्रशासकीय अडथळे होते.
आमदार राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि नासिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागात पाठपुरावा करून हा प्रकल्प सुरू होण्यातील सर्व अडथळे दूर केले होते.
या प्रकल्पाला लिक्विड मिळावे, यासाठी आमदार विखे यांनी विशेष पुढाकार घेऊन टँकर उपलब्ध करून दिले. ऑक्सिजन निर्मितीला शनिवारपासून सुरुवात झाली. ९ टन लिक्विड प्राप्त झाल्याने
या प्रकल्पातून एकूण ८०० सिलेंडर ऑक्सिजन निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला. ऑक्सिजन निर्मितीचा शुभारंभ आमदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे,
साई गॅसचे प्रवर्तक भाऊसाहेब पोकळे उपस्थित होते. पोकळे कुटुंबीयांचा आणि आमचा ॠणानुबंध खूप जुना आहे.
भाऊराव यांचे वडील आणि चूलते हे आमच्याकडे शेती मास्तर म्हणून कार्यरत आहे. या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याची प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|