महसूलमंत्री थोरातांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा,

यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोहारे येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोकडून तातडीची मान्यता मिळवून दिल्याने दररोज नव्याने सातशे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे.

थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे यांनी लोहारे-मीरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट दिली.

मंत्री थोरात यांनी आढावा बैठकीत ऑक्सीजन पुरवठादार राम जाजू यांना बोलावून याकामी सूचना दिल्या होत्या.

तसेच नगर शहरातही तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.

तळेगावच्या लोहारे-मीरपूर येथे कार्यरत असलेले ऑक्सिजन रेफिल्लींग सेंटर काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. इंद्रजीत थोरात यांनी तांत्रिक अडचणी समजून घेत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला.

यासाठी मंत्री थोरात यांनी पेसो कडून तातडीची मंजुरी मिळून दिली असून हा ऑक्सिजन पुरवठा रुग्णासाठी पुरवला जाणार आहे.

कोरोना संकट असून यात कोणीही राजकारण करू नये. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाय योजना करत आहे.

याबाबत ते दररोज आढावा घेत असून ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

लोहारे-मीरपूर येथील रीफिलिंग सेंटरमुळे परिसरातील शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्‍सिजन मिळणार असून याचा लाभ थेट रुग्णांना मिळणार असल्याचे इंद्रजीत थोरात यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|