पडळकर पुन्हा बरळले, म्हणाले…‘आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- लसीकरण आणि त्यामध्ये वारंवार होणारे बदल यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले कि, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही.

म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का,” असा बोचरा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता कोरोना प्रतिबंधक लसींअभावी राज्यातील हे लसीकरण होणार नसल्याचे सांगितले. त्यावरून पडळकर यांनी निशाणा साधला.

कोणतीही विचारधारा, अजेंडा नसताना हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी ते एकत्र आले आहेत.

मात्र, भाजपचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना ते जमले नाही. पण महाराष्ट्रातील जनतेचं जिरवण्याचं काम या सरकारने केले आहे, असेही पडळकर यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe