पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे.

दरवर्षीच राज्‍याच्‍या कृषि, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास व मत्‍सव्‍यवसाय विभागाच्‍या वतीने शेतक-यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि शेतक-यांचा सन्‍मान या निमित्‍ताने केला जातो. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्‍मदिवस हा शेतकरी दिन म्‍हणुन साजरा करण्‍याचा निर्णय यापूर्वी घेण्‍यात आला आहे.

त्‍यानुसार दरवर्षी शासनाच्‍या वतीने त्‍याची अंमलबजावणी केली जाते. यंदा कोव्‍हीड संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर या शेतकरी दिनाच्‍या निमित्‍ताने ऑनलाईन वेबिनार तसेच शेतक-यांसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्‍याच्‍या सुचना शासनाने कृषि विभागाला दिल्‍या आहेत.

शेतकरी दिनाच्‍या निमित्‍ताने जिल्‍हा स्‍तरावर तसेच ग्रामपंचायत स्‍तरावर शेतक-यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

प्रगतीशिल शेतक-यांचा सन्‍मान या निमित्‍ताने विविध ठिकाणी होणार असून स्‍थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, कृषि शास्‍त्रज्ञ, प्रगतिशिल शेतकरी यांच्‍या सहभागाने हा कृषि दिन सर्वत्र साजरा करण्‍याचे निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe