अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा परिसरातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली.
रस्त्यावर मोठमोठे दगड आल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. संगमनेर तालुक्यातील पठार भागात गेल्या काही दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
चंदनापुरी घाटात दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. कोठे बुद्रुकच्या रस्त्यावर दगडं आल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सुदैवाने दरड कोसळलेली असताना त्यावेळी या रस्त्यावरून कोणतेही वाहन तेथून जात नव्हते. या रस्त्यालगतच्या खालच्या बाजूला लोकवस्ती आहे.
हे दगड रस्त्यावरच अडकल्याने ते लोकवस्तीकडे सरकले नाही. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम