अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपला शेजारी असलेला पािकस्ताननेही भारताला मदतीचा हात देऊ इच्छित आहे.
कोरोनाच्या या संकटाच्या काळात आम्ही भारतासोबत आहोत. पाकिस्तानकडून मदतीच्या स्वरुपात भारताला व्हेंटिलेटर, बायपाईप मशीन, डिजिटल एक्सरे मशीन, पीपीई किट आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य देऊ इच्छित आहे,
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/04/clsdfipsdfboasfhrd0sdf2_202104604128.jpg)
असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताला लवकरात लवकर ही मदत मिळावी यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन काम करु शकतात. दोन्ही देश मिळून साथीरोगामुळे तयार झालेल्या आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग शोधू शकतात,
असेही पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानकडून मदतीचा हात पुढे करण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातील बिघडत्या कोरोना परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली होती.
त्यांनी शनिवारी (24 एप्रिल) ट्वीट करत भारतासोबत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. आपल्याला मानवतेसोबत मिळून या जागतिक आव्हानाचा सामना करायला हवा असंही त्यांनी नमूद केलं होतं.
दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानच्या ईधी वेलफेयर ट्रस्टने भारताला 50 रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भारतात पाठवण्याची तयारी दर्शवली होती.
ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रुग्णवाहिका पाठवण्याची तयारी दाखवली होती. ट्रस्टला कठीण काळात भारताविषयी सहानुभुती आहे. आम्ही भारताच्या मदतीसाठी रुग्णवाहिका पाठवू शकतो, असे ट्रस्टचे प्रमुख फैसल ईधी म्हणाले होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|