पंचायत समिती शेवगाव ला “सर्वोत्क्रुष्ट तालुका” प्रथम पुरस्काराचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- पंचायत समिती शेवगावला “सर्वोत्क्रुष्ट तालुका” प्रथम पुरस्कारा ने गौरविण्यात आले.

आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब व जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील यांच्या हस्ते “प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले.

महा अवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट तालुका या प्रकारात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला .

या वेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके उपस्थीत होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी पंचायत समिती सदस्य,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले व अभिनंदन केले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe