Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rain) चांगलाच कहर पाहायला मिळत आहे. गेल्या चार-पाच दिवसात अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) झाला आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात जोरदार पाऊस (Monsoon News) झाला असल्याने वाहतूक कोंडी बघायला मिळाली.
मात्र भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार राज्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच राहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, आज मराठवाडा तसेच विदर्भात पावसाची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट यासंबंधीत जिल्ह्यांना जारी केला आहे.
याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. या दोन जिल्ह्यांना देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. मित्रांनो या दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे.
पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजात नाशिक जिल्ह्यातीळ पावसासंदर्भात मोठ अपडेट दिल आहे. याव्यतिरिक्त पंजाब रावांनी संपूर्ण राज्यातील हवामान अंदाज देखील सांगितला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 20 सप्टेंबर रोजी राज्यात नाशिक जिल्ह्यासमवेतच नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीमहाराज नगर, परभणी, अहमदनगर, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उद्यापासून नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबराव यांच्या मते, नाशिक जिल्ह्यात उद्यापासून सूर्यदर्शन होणार असून उर्वरित राज्यात 23 सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. 24 सप्टेंबरनंतर राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील 4 ते पाच दिवस पाऊस नसणार आहे.
मित्रांनो राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी देखील मिळाली आहे.
दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. अशा परिस्थितीत या धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकरी बांधवांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे.