अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील आर्यन शिवाजीराव खिलारी याची उच्च शिक्षणासाठी अमेरीकेतील मिनेसोटा प्रांतामधील सेंट ओलेफ कॉलेजमधील भौतिकशास्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
पुढील ४ वर्षातील उच्च शिक्षणाकरिता सुमारे २ कोटी रूपयांची शिष्यवृत्ती त्याने प्राप्त केली आहे. त्याने याअगोदर उच्च माध्यमिक शिक्षण इंग्लंडमधील वेल्स प्रांतातील युडब्लुसी विद्यालयात घेतले असुन, तेथील शिक्षणासाठी त्याला ६४ लाखांची शिष्यवृत्ती मिळाली होती.
आर्यन याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथील कर्नल परब स्कूल येथे झाले आहे. आर्यन याने शैक्षणिक प्रगतीबरोबरच फुटबॉल खेळात नैपुण्य दाखविल्याने त्याची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
भारतातील मोजक्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरीकेसारख्या प्रगत देशातील विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळते त्यात त्याचा समावेश झाला आहे.
आर्यन हा अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी सर यांचा नातु असुन टाकळी ढोकेश्वरचे मा.सरपंच शिवाजीराव खिलारी यांचा मुलगा आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम