अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित डाळिंब पिक विमा योजनेसाठी उद्या बुधवारी विमा हफ्ता भरण्याची अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे.
तालुक्यात जवळपास ४७२१ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. संगमनेर, घारगाव, डोळासने, धांदरफळ बुद्रुक, साकुर, आश्वी बुद्रुक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, पिंपरणे आदी गावातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सिताफळ बागांचे क्षेत्र ७०.८० हेक्टर असून घारगाव आणि डोळासने गावातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत विम्याचा हफ्ता भरावा.
तसेच खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, कापूस, मूग, सोयाबीन, मका, कांदा आदी पिकांचा विमा हफ्ता भरण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत असल्याने यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
७/१२, ८अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, स्वयंघोषणा पत्र, पिकपेरा प्रमाण पत्र, फळबागेचा फोटो आवश्यक असल्याने अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शेंडे यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम