रुग्णांना दिलासा मिळणार; ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जिल्हा रुग्णालय येथे हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटचे काम अंतिम टप्यात आले आहे.

यामुळे लवकर येथील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

मंत्री तनपुरे यांनी गुरुवारी जिल्हा रुगणालयास भेट देऊन येथील विविध विभागाची पाहणी केली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा आदी उपिस्थत होते.

यावेळी त्यांनी अनेक रुग्नांचे नातेवाईक यांची देखील चोकशी केली. दरम्यान तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन

निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे,

आता त्यांनी दुसरा डोस घेणे महत्वाचे आहे, याबाबत सूचना केल्या. जिल्ह्यात लसीकरणासाठी जे केंद्र सुरु आहे

त्यांची संख्या वाढवण्यात येऊन लसीकरणासाठी आलेले नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले .

नागरिकांनी नियमाचे पालन करून घरीच राहावे व कोरोनाला हद्दपार करावे असे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe