लक्ष द्या ; उद्यापासून बँका चार दिवस बंद राहणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. यामुळे उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. देशातील १० लाख कर्मचारी तर राज्यातील ५० हजार कर्मचारी या संपावर असणार आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बँकांचे खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत १५ आणि १६ मार्चला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सलग चार दिवस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, डिजिटल बँकिंग आणि एटीएममुळे ग्राहकांना अहोरात्र आर्थिक व्यवहार करता येत आहेत. मात्र तरीही ४ दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!