Pension scheme : लगेचच करा गुंतवणूक! 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल दरमहा 5 हजार रुपये पेन्शन

Published on -

Pension scheme : आपल्या चांगल्या भविष्यासाठी अनेकजण वेगवेगेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सध्या अशा काही सरकारी योजना आहेत ज्यात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होईल. अशीच एक सरकारी योजना आहे.

या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अवघ्या 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळेल. शिवाय यात तुम्हाला निवृत्ती वेतनाची हमी आणि कर लाभ मिळेल. त्यामुळे आजच या सरकारी योजनेत गुंतवणूक करून चांगले पैसे कमवा. जाणून घ्या सविस्तर माहिती.

मिळते निवृत्ती वेतनाची हमी

वृद्धापकाळाचा आनंद घेण्यासाठी आता केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजना राबवण्यात येत आहे. ही एक प्रकारची पेन्शन योजना असून ती आपल्या गुंतवणूकदारांना हमखास परतावा देते. आता तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करून गुंतवणूक करू शकता. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला 1,000 रु. ते 5,000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. हे लक्षात घ्या की, या योजनेत गुंतवणुकीची वयोमर्यादा 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान निश्चित केली आहे.

प्रत्येक महिन्याला मिळेल 5,000 रुपयांची पेन्शन

या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. या योजनेत तुम्हाला कमीत कमी 20 वर्षे गुंतवणूक करता येते. म्हणजेच समजा तुमचे वय 40 वर्षे असल्यास तर तुम्ही त्यात गुंतवणूक सुरू करू शकता. त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होते.

उदाहरणार्थ, पेन्शनची गणना समजून घेण्यासाठी, तुमचे वय 18 वर्षे आहे असे गृहीत धरा. त्यानंतर या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपये म्हणजेच दररोज 7 रुपये जमा करून, तुम्ही 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये पेन्शनचा लाभ घेता येईल. समजा जर तुम्हाला 1000 रुपये पेन्शन हवे असल्यास तर या वयात तुम्हाला केवळ 42 रुपये मासिक जमा करावे लागणार आहे.

मिळेल कर लाभ

एपीवाय योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला हमी पेन्शनचा लाभ मिळत नसून इतर अनेक फायदे मिळतील. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ मिळेल. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत देण्यात येतो.

18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत खाते उघडण्यास पात्र असून देशातील प्रत्येक नागरिकाला या योजनेत गुंतवणूक करता येईल. हे खाते चालू करण्यासाठी, तुमच्याकडे वैध बँक खाते देखील असावे लागते. जे आधारशी जोडण्यात आले आहे. इतकेच नाही तर अर्जदाराचा मोबाईल क्रमांकही असावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe