अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाची स्थिती असली तरीही शाळांकडून फीची मागणी केली जात आहे. ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने सर्व शाळांनी ऑनलाईनच प्रवेश सुरू केले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरावी यासाठीही तगादाही लावला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम केला. एवढे सगळे सुरु असतानाही शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक फी वसूलच केली.
फीसाठी सक्ती करू नका असे शासनाने सांगूनही शाळा, कॉलेजने आदेश धुडकावून लावून आपली तिजोरी भरून घेतली. मागील वर्षात नगर शहरातील एक महिला महाविद्यालय फक्त दीड महिना ऑफलाईन चालले. मात्र या महाविद्यालयाच्या प्रशासनाने पालकांकडून शंभर टक्के शैक्षणिक फी वसूल केली.
ग्रामीण भागातील गरीब पालक शहरातील सुरक्षित ठिकाणी शिकण्यासाठी पाठवावे म्हणून या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक असतात.
त्यामुळे कर्जबाजारी होऊन पालक या महाविद्यालयाच्या अटी पूर्ण करतात. त्याचा गैरफायदा घेऊन या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने निधी जमा करण्याची शक्कल लढवित आहेत.
एकीकडे कोरोनाच्या काळात अनेक दानशूर मदतीच्या माध्यमातून पुढं येत आहे, तर दुसरीकडे शिक्षणाचा धंदा मांडलेला काही शिक्षण संस्थांनी याचे जोरदार भांडवल करत शाळांच्या तिजोऱ्यांमध्ये भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम