अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. आज सलग 17व्या दिवशी देशभरात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारला घेरले होते.
त्यामुळे कंपन्यांनी तूर्तास इंधन दर जसे आहेत तसेच ठेवले आहेत. 17 जुलैनंतर डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलचे दर जरी कमी-जास्त होत असले तरी आज देशात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच केंद्रानं दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मुंबईत आजचा एक लिटर पेट्रोलचा दर 107.83 रुपये आहे.
दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.49 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 102.08 रुपये झाले आहे. मुंबईत आज मंगळवारी डिझेलचा दर 97.45 रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल 89.87 रुपये आहे. चेन्नईत 93.63 रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा दर 93.02 रुपये प्रति लिटर झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम