PF Withdrawa Tips : नोकरी बदल्यानंतर पीएफ काढणे योग्य आहे का?, जाणून घ्या नाहीतर होईल पश्चाताप…

Sonali Shelar
Published:
PF Withdrawa Tips

PF Withdrawa Tips : चांगल्या भविष्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. अशास्थितीत बरेचजण पीएफ मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. प्रत्येक महिन्याला मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफमध्ये गुंतवली जाते. नियोक्ते देखील पीएफ खात्यात समान रक्कम जमा करतात. पगारदार व्यक्तींसाठी मोठी बचत करण्याचा PF हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो.

जेव्हा जेव्हा नोकरी बदलते तेव्हा बरेच लोक त्यांच्या पीएफ खात्यातून (भविष्य निर्वाह निधी) ताबडतोब पैसे काढतात. पण तुम्हाला माहिती आहे का? असे केल्यास तुम्हाला भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. होय हे सत्य आहे.

सर्वप्रथम, आपण PF (PF Withdraw Tips) मध्ये गुंतवणुकीचे फायदे जाणून घेऊया. आपण असे गृहीत धरू की जेव्हा तुम्ही तुमची नोकरी सुरू केली तेव्हा वयाच्या 20 व्या वर्षी तुमचा पगार 15000 रुपये होता. जर तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालात. म्हणजे तुम्ही ३८ वर्षे काम कराल. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 12 टक्के दराने 1800 रुपये पीएफ खात्यात जमा होतील. नियोक्ता देखील समान रक्कम जमा करेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात २३५० रुपये जमा होतील.

12 टक्क्यांपैकी 3.67% रक्कम पीएफमध्ये जाईल आणि 8.33% रक्कम ईपीएससाठी जमा केली जाईल. अशा परिस्थितीत तुमचा पगार दरवर्षी फक्त पाच टक्क्यांनी वाढतो असे मानू. त्यामुळे पीएफ योगदानही त्याच प्रमाणात वाढेल.

अधिक वेळ, अधिक फायदे

आता पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.15% दराने व्याज उपलब्ध आहे. यापूर्वी हा दर ८.१० टक्के होता. अशा परिस्थितीत, ईपीएफ कॅल्क्युलेटरच्या गणनेनुसार, दरवर्षी पगारात पाच टक्के वाढ केल्यास, तुम्हाला निवृत्तीनंतर 1.73 कोटी रुपये मिळू शकतात.

नोकरी बदलल्यास काय करावे?

तुम्ही नोकरी बदलल्यास, पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढण्याऐवजी खाती दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित करणे कधीही चांगले. UAN सह विलीन करणे ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. पण तुम्ही नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे काढत राहिल्यास तुमच्या परताव्यावर परिणाम होईल.

जर पीएफ खाते उघडून पाच वर्षे उलटली नाहीत आणि त्यापूर्वी पैसे काढले गेले तर त्यावर कर भरावा लागेल. पाच वर्षानंतर पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर कोणताही कर लागत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe