लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी ‘या’ राजकीय नेत्याचा फोटो!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर ममता बॅनर्जी या आधीपासूनच सवाल उपस्थित करत आल्या आहेत. त्यांनी वारंवार देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी तृणमूल काँग्रेसनं कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाणं हे निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं भंग असल्याचा आरोप तृणमूलनं केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe