अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर – भाऊसाहेब फिरोदिया स्नेह 75 ग्रुपच्यावतीने ‘राष्ट्रीय कॅमेरा दिवसा’निमित्त प्रेस फोटोग्राफरांचा उद्योजक विश्वनाथ पोंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फोटोग्राफर संदिप भुसे, संजय आडोळे, उदय जोशी, सचिन निक्रड, अमोल बारस्कर आदि उपस्थित होते. याप्रसंगी विश्वनाथ पोंदे म्हणाले, कॅमेरा हा एका सेकंदासाठी डोळे मिटतो, पण माणसाच्या आयुष्यभराच्या आठवणी कैद करतो.

पानभर मजकूरपेक्षा एक फोटो अनेक पैलू सांगून जात असतो. त्यामुळे फोटो आणि फोटोग्राफरला फार महत्व आहे. भाऊसाहेब फिरोदिया स्नेह 75 च्यावतीने नगरमध्ये सामाजिक कार्य करणारा ग्रुप आहे.
कोरोना काळात कार्य करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पत्रकार, फोटोग्राफर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील कार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार ग्रुपच्यावतीने करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी संदिप भुसे म्हणाले, 29 जून हा राष्ट्रीय कॅमेरा दिवस म्हणून साजरा केला जातो. 100 वर्षांपूर्वी कॅमेर्याचा शोध लागला. इब्रन अल हायथम या अरब शास्त्रज्ञाने याचा शोध लावला; त्या कॅमेराला ऑबसकुरा नाव दिले.
त्यानंतर 1816 साली फ्रेंच संशोधन जोसेफ नाईसफोर निपसे यांनी फोटो जतन करणारा कॅमेर्याचा शोध लागला. तर परिपूर्ण कॅमेरा हा 1829 मध्ये अॅलेक्झँडर वोलकॉट यांनी शोधला. त्यानंतर विविध स्थित्यंतरे होत आज डिजिटालेझशन झाले आहे.
स्नेह 75 ग्रुपच्यावतीने आमचा सर्वांचा सत्कार करुन जो सन्मान केला आहे, तो अविस्मरणीय असेल, असे सांगून आभार मानले. यावेळी संजय आडोळे, सचिन निक्रड यांनी मनोगत व्यक्त केले
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम