अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-सततच्या होणाऱ्या आरोपाला कंटाळून अगस्ती कारखान्याच्या संचालकांनी राजीनामे दिले होते. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
यावर प्रतिक्रया देताना ‘अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले कि, अगस्ती हि तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून
कोणतेही राजकारण न आणता ती बंद पडू देणार नाही हि माझी , कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पा. गायकर व सर्व संचालकांची भूमिका असल्याने त्यांनी राजीनामे दिल्याने अगस्ती कार्यस्थळावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्यात आली.
मात्र काही व्यवसायिक टोळी कारखाना बंद पडण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोक षड्यंत्र करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अगस्ती चालविण्यास घेणार आहेत
असे मी पत्रकार परिषदेत म्हणालो असा खोटा प्रचार करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा काहींचा डाव आहे. आपण असे कोणतेही वक्तव्य अगर पत्रकार परिषद मध्ये बोललो नाही, याबाबत आपण कधीही त्याची शहनिशा करण्यास तयार आहोत.
आपल्या कानावर काही हितचिंतकांनी हि गोष्ट घातल्याने आपण हा खुलासा करत आहोत असेही पिचड म्हणाले. अगस्ती सहकारी साखर कारखाना पत्रकार परिषदेत मी बोललो होतो कि,काही व्यवसायिक लोकांना कारखाना बंद पाडून विकत घ्यायचा आहे असे बोललो होतो
मात्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नावाचा उल्लेख केला नाही. मात्र राजकीय विरोधक मात्र अजित पवार व बाळासाहेब थोरात यांना खोटे नाटे सांगून गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचा खुलासा पिचड यांनी केला आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम