पंतप्रधान मोदी हे तर कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही.

त्यांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियम मोडले, त्यामुळे पंतप्रधान मोदी हे कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर आहेत, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी केला आहे. द ट्रेब्युने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो. डॉ. नवज्योत म्हणाले, देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये आढळून आला, त्यावेळीही मोदींनी याकडे गांभीर्याने पाहिलं नाही.

देशात पहिला रुग्ण आढळल्यानंतर मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली, असे डॉ. नवज्योत यांनी म्हटलं आहे.

देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा या कोरोना परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या आहेत, असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाही.

मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिलं. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिलं आणि त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढला, असे डॉ. नवज्योत म्हणाले. बाबा राम देव यांच्या पतंजलीच्या औषधांना समर्थन देण्याच्या

मोदी सरकारच्या निर्णयावरही डॉ. नवज्योत यांनी टीका केली. आता कोरोनाच्या दुसरी लाट सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत आहे.

पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही,” असंही डॉ. नवज्योत म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|