अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पोलिस आणि पत्रकार हे दोघेही अनेक अडीअडचणीचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते.
त्यामुळे पोलिस या आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.
कर्जत येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. सर्वसामान्य कुटुंबातून च तयार होतात त्यामुळे समाजाचे प्रश्न त्यांना लगेच समजतात,
पत्रकारामुळेच समाज हा लाईन वर राहतो, ट्रॅकवर चालतो, पंतप्रधान मुख्यमंत्री खासदार आमदार असो जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी असो अथवा कोणताही अधिकारी, पुढारी असो या सर्वांना वेसण घालण्याचे काम पत्रकार करत असतात,
मात्र पत्रकारांच्या ही अनेक अडीअडचणी आहेत त्या सोडविण्याची गरज आहे, असे म्हटले यावेळी पत्रकाराच्या पत्नी उपस्थित होत्या त्यांना उद्देशून यादव यांनी घरी पत्रकारांना समजून घेत चला बाहेर प्रचंड ताणतणाव असतात
त्यांंना सर्वाना सांभाळावे लागते, त्यामुळे तुमची साथ आहेच ती अशीच ठेवा असे म्हटले व पत्रकारांनी नक्की आमच्या चुका दाखवाव्यात आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू असे म्हटले .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम