अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला शिराळा (ता. पाथर्डी) शिवारात पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब ऊर्फ बाळा रमेश भिंगारदिवे (रा. आडगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे.
दोन दिवसापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव यांना भिंगार पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज शिवारात अटक केली होती.
यातील एकमात्र आरोपी बाळासाहेब भिंगारदिवे पसार होता. तो पाथर्डी तालुक्यातील शिराळा गावामध्ये आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
पोलीस पथकाने तातडीने भिंगारदिवे याला अटक केली. दरम्यान याप्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम