अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नेवासा बसस्थानकात प्रवाशी नागरिकांचा खिसा मारणार्या काही महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून नेवासा बसस्थनाक येथे प्रवाशांची पाकीट मारल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या बसस्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असते.
अनेक प्रवाशांना नेहमीच घाई गडबड असते याच गोष्टीचा फायदा काही पाकिटमार घेतात आणि गोरगरिब नागरिकांचा खिसा मारतात.
पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गोपनीय माहिती वरून बस (एमएच 20 बी 1690) गंगापूर-नेवासा या बसमधील पाच ते सहा महिला पाकिटमार यांना पकडले आणि सरळ पोलीस ठाण्यात नेले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|