रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांना पोलिसांकडून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक प्रकरण नगरमध्ये घडले आहे.

रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशा कि, नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अवैधरित्या साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर आधी छापा टाकण्यात आला. हे दोन्ही दुकाने सुरेश रासकर यांच्या नावावर आहेत.

पोलिसांनी ही दोन्ही दुकाने सील केली. त्यानंतर मार्केट यार्ड येथील या दुकानांमध्ये कोतवाली पोलिसांनी काळ्या बाजारात नेण्यात येणार्‍या 253 गोण्या तांदुळाच्या व 125 गोण्या गव्हाच्या सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच

याठिकाणी दोन ट्रक यांची सुमारे किंमत प्रत्येकी पाच लाख अशा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज मार्केट यार्ड परिसरातून हस्तगत केलेला आहे.

याच वेळी पोलिसांनी व प्रशासनाच्या पथकाने रासकर यांच्या केडगाव इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या गोदामावर छापा टाकून त्या ठिकाणी तांदळाच्या 132 गोण्या,247 गव्हाच्या गोण्या व 47 आणखी गव्हाच्या गोण्या आशा सर्व मिळून 419 गोण्या जप्त केल्या.

मार्केट यार्डमधील धान्य सुमारे पावणे चार लाखाचे तर केडगाव येथील धान्य सुमारे 4 लाखाचे असून दोन्ही मिळून सुमारे 8 लाखाचे धान्य तसेच सुमारे 33 लाख रुपये किमतीची 6 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल होणार असून पोलिसांनी त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News