पाकिटमारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या सात महिला पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-साईबाबा संस्थानच्या भोजनालय परिसरात पाकिटमारी करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या श्रीरामपूर शहरातील दोन वयस्कर व पाच तीस ते चाळीस वयोगटातील महिलांना साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांनी काल दुपारी शिताफीने पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

श्रीरामपूर शहरातील काही महिला साईभक्त भाविकांच्या पर्स, चिजवस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने या परिसरात नेहमीच वावरत असतात.

बसस्थानक परिसर, साईबाबा मंदिर परिसर तर प्रसाद भोजनालय परिसरात या महिला संशयास्पद हालचाल करताना आढळून येतात.

मागील महिन्यात अशाच संशयित महिलांनी मुंबई येथील साईभक्त महिलांची पर्स चोरी केली होती. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही.

त्यामुळे अशा घटना घडू नये, यासाठी साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांना कडक कारवाईबाबत सुचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा रक्षक नाना हासे,

समाधान बनकर यांच्या पथकाने या महिलांना पकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्याचे समजते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्याचे अंमलदार माघाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,

सात महिला ताब्यात असून संबंधित महिलांवर कठोर कारवाई करणार आहे. त्यामुळे शिर्डी परिसरात साईभक्तांच्या वस्तूंच्या होणाऱ्या चोरीला आळा बसेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe