अवैध दारूची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अहमदनगर शहरांमधील चांदणी चौक परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला विनापरवाना बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 09 मार्च 2021 रोजी ऋषीकेश लक्ष्मण बोरूडे (वय 21 रा.सारोळा बद्धी ता. नगर जि,नगर) यास विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले असून तसा कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कॅम्प पोलीस स्टेशन भिंगारचे प्रभारी अधिकारी सपोनी शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि,चांदणी चौक,अहमदनगर येथे एक इसम हा विनापरवाना बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करीत आहे.

सदर माहिती मुलतः पोलीस पथकाने आरोपी ऋषीकेश लक्ष्मण बोरूडे यास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याच्याकडून एक दुचाकी (50,000/- रू. किं ची) विदेशी दारू 10,620 /- असा एकूण 60,620/- किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|