सराईत दुचाकीचोरास पोलिसांनी केले मुद्देमालासह अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे रस्तालूट व विविध मोटारसायकलींच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एका आरोपीस शिंगणापूर पोलिसांनी अटक केली.

त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, 2 फेब्रुवारी 2021 रोजी चांदा येथील रवींद्र राजेंद्र कदम यांना कांगोणी फाटा

येथील सुडके महाराज आश्रमाजवळ नितीन मोहन राशिनकर व नामदेव उत्तम मोहिते या दोघांनी रस्त्यात मोटारसायकल आडवी लावून मारहाण करुन 13 हजार 500 रुपये रक्कम तसेच दोन तोळ्याची सोन्याची चेन त्याचबरोबर विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज लुटून नेला होता.

दोघा आरोपींपैकी नितीन मोहन राशिनकर याला तात्काळ पकडण्यात आले होते. तर दुसरा आरोपी नामदेव उत्तम मोहिते (वय 29) रा. म्हाळसपिंपळगाव ता. नेवासा हा गुन्हा घडल्यापासून पसार होता.

तो गावी येणार अशी माहिती मिळाल्यावर त्यास शिंगणापूर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. सदर आरोपीच्या ताब्यातून चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe