दरोड्याच्या तयारीतील चौघांना पोलिसांनी पकडले तर दोघे फरार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी चौघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

तर दोघे जण फरार झाले आहे. दरम्यान संगमनेर पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास समनापूर बाह्यवळण ते पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हि आक्रमक कारवाई केली.

आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडील दुचाकी वाहन व तीन कोयते, एक गिलोर असा ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपींची नावे :- विक्रम रामनाथ घोडेकर (वय २०) अजित अरुण ठोसर (वय २०) (दोघेही रा. पंपिंग स्टेशन, कासारा-दुमाला रस्ता, संगमनेर), सर्फराज राजू शेख (वय १९, रा. लालतारा कॉलनी जवळ, अकोले नाका, संगमनेर) कलीम अकबर पठाण,

हलीम अकबर पठाण व आसिफ शेख (सर्व रा. जमजम कॉलनी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. यातील कलीम पठाण व आसिफ शेख हे दोघे पसार असून हलीम पठाण याला दुपारी पकडण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe