अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सिव्हील हडको येथील गणेश चौकातील वैष्णवी लॉटरी येथे शिवसेनेचा पदाधिकारी असलेला काका शेळके याच्यासह नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे.
जुगाऱ्यांची नावे शिवसेनेचा पदाधिकारी काकासाहेब चंद्रकांत शेळके, सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद मोहन मगर, बंडू गणपत भोसले, नितीन कुशालचंद गुगळे, अमोल पांडुरंग ढापसे (सर्व रा. सिव्हील हडको), महेश अशोक ओझा,

अनिकेत राजेंद्र ओझा (दोघेही रा. भिंगार) आणि अनिल मोहन मगर (रा. सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली. याबाबत अधिक माहिती अशी कि,
आरोपी काकासाहेब शेळके हा स्वत:च्या फायद्याकरिता आरोपी सुनील हिवाळे, मिलिंद मगर, बंडू भोसले, नितीन गुगळे, अमोल ढापसे, महेश ओझा, अनिकेत ओझा आणि अनिल मोहन मगर यांना पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळवत होता.
यावेळी तोफखाना पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी आरोपींकडून सहा हजार 350 रुपयांची रोख रक्कम व तिरट जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
यांसदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात पोकॉ. शैलेश उत्तमराव गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम