दरोडेखोरांना आश्रय देणार्‍यास पोलिसांनी केले जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मागील आठवड्यात ग्रामसुरक्षा दलातील युवक व सोनई पोलिसांनी सोनई ते मोरेचिंचोरे व नंतर शेतात पाठलाग करून सहा आरोपींस अटक केली होती.

दरम्यान परप्रांतीय आरोपीस आश्रय दिल्याप्रकरणी भगवान अंबादास इलग (रा. मोरेचिंचोरे) यास सहआरोपी करून नेवासा न्यायालय येथे हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील आठवड्यात ग्रामसुरक्षा दलातील युवक व सोनई पोलिसांनी सोनई ते मोरेचिंचोरे व नंतर शेतात पाठलाग करून सहा आरोपींस अटक केली होती.

त्यावेळी तेथील वस्तीवरून दरोड्यात वापरत असलेली हत्यारे, चोरीचे डिझेल व एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले होते. दरम्यान परप्रांतीय आरोपीस आश्रय दिल्याप्रकरणी भगवान इलग (रा. मोरेचिंचोरे) यास न्यायालयाने 03 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

सोनई पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या अगोदरच्या सहा आरोपींवर मालेगाव, शिर्डी, अहमदनगर एमआयडीसी पोलीस स्टेशनला डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe