अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-शहरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम उर्फ बल्ली यादव (वय.30 रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

file photo
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बळीराम उर्फ बल्ली यादव हा 25 हजार रुपयांच्या गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर शहरात वावरताना आढळून आला.
पोलिसांनी यादवला मोठ्या शिताफीने पकडले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका. जोसेफ साळवे हे करत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|