अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच नगरपालिकेचे कर्मचारी देखील जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र कोपरगावात पालिकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अडवून त्याला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत कारवाई करण्यात यावी या मागणी संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. पोलिसांची या दादागिरीचा सर्वसामान्यांकडून निषेध करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
कोरोनाच्या नवीन नियमांतर्गत दुचाकींप्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, काही पालिका कर्मचार्यांकडे वाहने नसल्याने त्यांना सहकार्यासोबत एकाच दुचाकीवर जाण्याची वेळ येते.
दरम्यान, कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे पालिका व पोलीस पथक संयुक्तरित्या नाकाबंदी करुन कारवाई करत होते. त्याचवेळी एसएसजीएम महाविद्यालयातील कोविड सेंटरमधून पालिकेचे सफाई कर्मचारी देवेंद्र डाके व पंकज गोयर हे कर्तव्य निभावून घरी परतत होते.
त्यांच्या अंगावर गणवेश व ओळखपत्र असतानाही पोलिसांनी दुचाकी अडवून चावी काढून घेत मारहाण करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. कोविडच्या संकटात आरोग्य, पोलीस, महसूल यांच्याबरोबर पालिकेचे कर्मचारी देखील जीव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य निभावत आहे.
मात्र, पोलिसांनी याचा कोणताही विचार न करता केलेले कृत्य निषेधार्थ आहे. याबद्दल अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|