पोलिसांनी पाठलाग करत दोघा चोरट्यांना केले जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-नगरच्या एलसीबीने राहाता येथील गणेशनगर भागात दोन चोरट्यांना पाठलाग करत अटक केली तर इतर चौघे पसार झाले आहेत.

पोलिसांनी शुभम अनिल काळे, भरत उर्फ भुऱ्या तात्याजी काळे (दोघेही रा. गणेशनगर, राहता) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तर आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे ( तिघेही रा. गणेशनगर) असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान बुलेट, पल्सर मोटरसायकली, मोबाईल, गलोल, मिरचीपूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्यांकडून जप्त केलेल्या मोटरसायकली चोरीच्या निघाल्या असल्याची माहिती पी आय अनील कटके यांनी दिली.

जप्त केलेल्या दुचाकीमध्ये बुलेट औरंगाबादच्या वाळूंज परिसरातून, तर पल्सर नेवासा तालुक्यातून चोरी केल्याची कबुली अटकेतील दोघांनी दिली. हि कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,

गणेश इंगळे यांच्या टीममधील पोलीस नाईक संतोष लोंढे, शंकर चौधरी, प्रकाश वाघ, संदीप दरंदले विनोद मासाळकर, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe