पोलिसांची वाळूतस्करांवर धडक कारवाई ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त : आठ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावाच्या शिवारातील घोडनदी पात्रात बेलवंडी पोलिसांनी अवैध वाळूउपसा  करणाऱ्यांवर धडक कारवाई करून  तब्बल ३७ लाख ४०हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच याप्रकरणी आठ बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह. तर एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर असे की शुक्रवार दि.१९ रोजी बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की,

म्हसे गावाच्या शिवारातील घोडनदी पात्रात काहीजण यांत्रीक बोटीच्या सहाय्याने अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा करत आहेत. आता लगेच कारवाई केल्यास सर्वजण मुद्देमलासह आढळून येतील.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर पठारे, संतोष गोमसाळे पो.कॉ.सतीश शिंदे यांनी घोड नदीपात्रात कारवाई केली.

यात २० लाख रूपये किमतीचा (एमएच १२ क्यू डब्ल्यू ६३३३) हायवा, ४० हजार रुपयांची चार ब्रास वाळू १२ लाख रुपये किंमतीची वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट, ३ लाख रूपये किमतीची फायबर बोट, तर २ लाख रुपये किंमतीची फायबर बोटीतून हायवामध्ये वाळू भरण्यासाठी वापरलेली बोट असे एकूण ३७ लाख ४०हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पो.कॉ.सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून बापू मारुती गोरडे बाबुराव नगर, दीपक येळे (रा.पारोडी ता. शिरूर), कमलेश श्रीकांत शेंडगे (राजापूर ता.श्रीगोंदा) तसेच पाच ते सहा अनोळखी कामगार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी बापू मारुती गोरडे या हायवा चालकाला अटक करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास पो.ना पठारे डी.आर.करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe