अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- नाशिक शहरात कोरोनाचे 2 हजार 90 रुग्ण तर जिल्ह्यात 4 हजार 99 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह केस 2 हजार 905 एवढ्या आहेत.
असे असतानाही भावी पोलिसांकडूनच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले.महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीत मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करताच पोलीस नाचत होते.
डान्स फ्लोअरवर नाचणारे हे सर्व पोलिस येत्या 30 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा आटोपून राज्य शासनाच्या सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
मात्र तेच जर असा हलगर्जीपणा करत असतील तर सर्वसामान्यांचं कायअसा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक शहरात सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतानाही महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत हा कार्यक्रम कसा आयोजित करण्यात आसा असाही प्रश्न विचारला जात आहे.
भावी पोलीस अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|