अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- जामखेड मागील चार वर्षापासून दरोडा, आर्म अॅक्ट सह विविध गुन्ह्यांमध्ये फरारी असणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
यामध्ये पोलिसांनी प्रदीप राजू कांबळे, बाळू सिताराम मिसाळ व विशाल जगन्नाथ जाधव ( सोनेगाव ता. जामखेड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 4 वर्षांपासून फरार असलेले वरील तीनही आरोपी हे त्यांच्या गावी आले असल्याची खबर गुप्त बातमीदार मार्फत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार तात्काळ पोलिस पथकाने सापळा रचत दि.९ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तीनही अरोपींना अटक करून पोलीस स्टेशन जामखेड येथे हजर केले. दरम्यान फरार गुन्ह्यातील आरोपी पकडण्याची कारवाई यापुढे सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|