वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीस पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नुकतेच पोलिसांनी वाहनांमधील डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

दरम्यान पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या टोळीला गजाआड केले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अमोल मच्छिंद्र आहेर (रा.वाकडी, ता.राहाता), चेतन अरविंद गिरमे (रा.धारणगाव, ता.कोपरगाव),

राजीवसिंह रामअसरेसिंह (रा.उत्तर प्रदेश), अंगदकुमार रामपाल बिंद (रा.उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार 150 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यात पिकअप, बॅरेलमध्ये चोरलेले डिझेल व अन्य साहित्याचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आलेली वाहने उभी केली जातात.

चोरांनी या वाहनांतून 1 लाख 13 हजार 200 रुपये किंमतीचे 1140 लिटर डिझेल, तसेच वाहनांच्या बॅटर्‍या, सेल्फ स्टार्टर, बॅटर्‍यांच्या केबल असा मुद्देमाल लांबविला.

याबाबत विक्रांत राजेंद्र सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली.

या पथकाने अवघ्या 24 तासांत वरील चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या धडाकेबाज कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe