अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे.
दरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून 8 हजार 720 ची रोकड, तीन मोटारसायकल असा 3 लाख 58 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदिराच्या बाजूस वडाच्या झाडाखाली उघड्यावर जुगार चालू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली.
त्यावरून त्यांनी आपल्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला व पाच जणांना ताब्यात घेतले.
यामध्ये रामनाथ कचरू मगर (वय २८), भिवसेन दिलीप मगर (वय ३२), संतोष सुदाम मगर (वय ३८), उमेश दत्तात्रय गोंठे (वय ४३), राजू सर्जेराव साळवे (वय ३६) सर्व रा. कोंडेगव्हाण यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|