अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- नेवासा शहरातील खाटीक गल्लीत पोलीस पथकाने छापा टाकून 110 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा पोलिसांच्या पथकाने खाटीक गल्लीत स्विफ्ट कार (एमएच 17 एजे 7279) मधून 110 किलो गोमांस घेऊन जात असताना छापा टाकला.
आरोपी मुजाहिद गुलाब चौधरी व सिद्धीक गनी चौधरी (रा. नेवासा खुर्द) यांना पकडले आहे. काँन्स्टेबल अंकुश दत्ता पोटे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|