अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- अवैध धंदे जिल्ह्यात डोके वर काढू लागल्याच्या घटना घडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनांना रोख बसावा यासाठी आक्रमक कारवाया देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नुकतेच पोलीस पथकाने नुकतेच एका मटका अड्ड्यावर छापा टाकून सोनई पोलिसांनी एकावर कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, बस स्टँड जवळच्या टपरीच्या आडोशाला विलास सूर्यभान शिंदे (वय 30 रा. सोनई हा पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवताना मिळून आला.

त्याच्याकडून 380 रुपये रुपयांची रक्कम (100, 50 व 10 रुपयांच्या चलनी नोटा) व कल्याण मटका जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल अमोल बंकट जवरे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













